कोल्हापूर - भाविकांविना यंदा टेंबलाई टेकडीवर ललिता पंचमीचा सोहळा सजला. करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि त्र्यंबोलीदेवीच्या भेटीनंतर कोहळा फोडण्याचा पारंपरिक विधी झाला. त्यानंतर काही काळ कोहळ्याचे तुकडे मिळवण्यासाठी थरार अनुभवायला मिळाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अंबाबाईची पालखी फुलांनी सजवलेल्या वाहनांतून टेंबलाई टेकडीवर सोहळ्यासाठी आली. शाहू मिल व टाकाळा येथे परंपरेप्रमाणे पालखी थांबली. दरम्यान, श्री अंबाबाईची आज गजारूढ रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली.
#kolhapur #kolhapurnews #marathi #marathinews